पोस्ट्स

दोन जेवणामधील अंतर.....

 गेल्या सव्वाशे वर्षांपासून आहाराच्या सवयींचे पाश्चात्यीकरण (westernization of dietary habits) झाल्यामुळे आधुनिक जीवनशैलीचे आजार (diseases of civilization) जडत आहेत. वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम म्हणून, माणूस अकाली वृद्ध तर होत आहेच, परंतु आजारीदेखील पडत आहे. सध्याचे प्रचलित रोग आणि दीर्घकाळापर्यंत होणारे त्रास लक्षात घेता, आजीवन आरोग्य खूपच लांब आहे. मध्यमवयात हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर अशा रोगांचा धोका हळूहळू वाढत जातो. विकसित देशात हिरड्यांचे रोग (gum diseases) हे जवळजवळ 50 टक्के मध्यमवयीन व्यक्तींमध्ये आढळतात. भारतात शहरी भागात राहणाऱ्या 30 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुलांचे दात किडलेले असतात. जपान व दक्षिण कोरियामध्ये हेच प्रमाण 80 टक्के इतके आहे. तर सिंगापूरमध्ये फळ्यावर लिहिलेले स्पष्ट दिसण्यासाठी 95 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो. शरीराची वाढ पूर्ण झालेल्या अठरा वर्षावरील तरुणांमध्ये चष्म्याचा मायनस नंबर वाढत जातो (progressive myopia). हे सर्व आधुनिक जीवनशैलीचे आजार म...

गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन....

  गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन...... एखाद्या व्यक्तीच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. समाजातील प्रचलित समजुतींप्रमाणे व रूढींप्रमाणे किंवा नोकरशाही पद्धतीने व्यक्तीच्या गुणवत्तेचे मूल्यमापन केल्यास अत्यंत चुकीचे निष्कर्ष निघतात. आयुष्याच्या प्रारंभी ज्या व्यक्तींना अतिसामान्य किंवा निकृष्ट दर्जाचे समजले जात होते त्याच व्यक्ती पुढे जाऊन जगप्रसिद्ध बनल्या. अशा व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेतल्याने आयुष्यात सतत प्रेरणा मिळत राहते. जगप्रसिद्ध लोकांचे यश एक उदाहरण आणि प्रेरणा असू शकते. ही मत्सराची सामान्य भावनासुद्धा असू शकते किंवा, उदाहरणार्थ, प्रामाणिक प्रशंसा - कोणत्याही परिस्थितीत, एखाद्याचे प्रतिकूल परिस्थितीत मिळालेले यश हे आपल्याला अधिक कठोर आणि चांगले काम करण्यास उत्तेजित करू शकते. मानवी इतिहासात जगप्रसिद्ध झालेल्या अनेक महान व्यक्तींना त्यांच्या बालपणात आणि अगदी लहानपणापासूनच, अगदी मूर्ख नसले तरी मंदबुद्धीचे मानले गेले होते. वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाईन याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी उशीरा बोलायला सुरुवात केली! आईन्स्टाईनने शाळेत असताना भौतिकशास्त्...