दोन जेवणामधील अंतर.....
गेल्या सव्वाशे वर्षांपासून आहाराच्या सवयींचे पाश्चात्यीकरण (westernization of dietary habits) झाल्यामुळे आधुनिक जीवनशैलीचे आजार (diseases of civilization) जडत आहेत. वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम म्हणून, माणूस अकाली वृद्ध तर होत आहेच, परंतु आजारीदेखील पडत आहे. सध्याचे प्रचलित रोग आणि दीर्घकाळापर्यंत होणारे त्रास लक्षात घेता, आजीवन आरोग्य खूपच लांब आहे. मध्यमवयात हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर अशा रोगांचा धोका हळूहळू वाढत जातो. विकसित देशात हिरड्यांचे रोग (gum diseases) हे जवळजवळ 50 टक्के मध्यमवयीन व्यक्तींमध्ये आढळतात. भारतात शहरी भागात राहणाऱ्या 30 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुलांचे दात किडलेले असतात. जपान व दक्षिण कोरियामध्ये हेच प्रमाण 80 टक्के इतके आहे. तर सिंगापूरमध्ये फळ्यावर लिहिलेले स्पष्ट दिसण्यासाठी 95 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो. शरीराची वाढ पूर्ण झालेल्या अठरा वर्षावरील तरुणांमध्ये चष्म्याचा मायनस नंबर वाढत जातो (progressive myopia). हे सर्व आधुनिक जीवनशैलीचे आजार म...