दोन जेवणामधील अंतर.....

 गेल्या सव्वाशे वर्षांपासून आहाराच्या सवयींचे पाश्चात्यीकरण (westernization of dietary habits) झाल्यामुळे आधुनिक जीवनशैलीचे आजार (diseases of civilization) जडत आहेत.

वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम म्हणून, माणूस अकाली वृद्ध तर होत आहेच, परंतु आजारीदेखील पडत आहे. सध्याचे प्रचलित रोग आणि दीर्घकाळापर्यंत होणारे त्रास लक्षात घेता, आजीवन आरोग्य खूपच लांब आहे. मध्यमवयात हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, कॅन्सर अशा रोगांचा धोका हळूहळू वाढत जातो. विकसित देशात हिरड्यांचे रोग (gum diseases) हे जवळजवळ 50 टक्के मध्यमवयीन व्यक्तींमध्ये आढळतात. भारतात शहरी भागात राहणाऱ्या 30 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो आणि 50 टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुलांचे दात किडलेले असतात. जपान व दक्षिण कोरियामध्ये हेच प्रमाण 80 टक्के इतके आहे. तर सिंगापूरमध्ये फळ्यावर लिहिलेले स्पष्ट दिसण्यासाठी 95 टक्के शाळकरी मुलांना मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो. शरीराची वाढ पूर्ण झालेल्या अठरा वर्षावरील तरुणांमध्ये चष्म्याचा मायनस नंबर वाढत जातो (progressive myopia). हे सर्व आधुनिक जीवनशैलीचे आजार म्हणून ओळखले जातात.

कॅन्सर, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा रोगांसाठी आधुनिक परंपरागत वैद्यकशास्त्र औषधांचा प्रचंड मारा करते किंवा ऑपरेशन्स सुचवली जातात. परंतु आहारांच्या सवयींमध्ये योग्य बदल करून कुठलीही आधुनिक औषधे किंवा ऑपरेशन्स यांचा वापर न करता योग्य आहार प्रणालीद्वारे गंभीर आजार नियंत्रणात आणले जाऊ शकतात. डॉक्टरांनी ज्या गंभीर आजारग्रस्त पेशंटच्या मेडिकल रिपोर्टमध्ये "एका महिन्यात मृत्यू अटळ", "तीन महिन्यात मृत्यू अटळ" असा शेरा मारला होता असे रुग्ण रशियन व अमेरिकन संशोधकांनी सुचवलेल्या आहार प्रणालीतील योग्य बदलामुळे डॉक्टरांचा शेरा पूर्णपणे चुकीचा व खोटा ठरवत कोणी पाच वर्ष, कोणी दहा वर्षे तर कोणी पंधरा-वीस वर्षे जास्त जगले. आहाराच्या सवयींचे पाश्चातीकरण टाळून आहाराच्या सवयींमध्ये सोपा बदल केल्यास आधुनिक जीवनशैलीचे आजार सहजपणे टाळता येतात.

आधुनिक जीवनशैलीचे आजार जडण्याचे प्रमुख कारण म्हणजे - आहाराच्या सवयींच्या पाश्चातीकरणामुळे इन्सुलिन संवेदनशीलता (insulin sensitivity) कमी होणे आणि यामुळे शरीरात गरजेपेक्षा अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार होते. मध्यम वयात जडणारा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर इत्यादीचे कारण म्हणजे आहाराच्या सवयींच्या पाश्चातीकरणामुळे व वाढत्या वयामुळे इन्सुलिन संवेदनशीलता कमी होणे. दिवसातून अनेक वेळा वारंवार खाणे (frequent snacking throughout the day), हे आहाराच्या सवयींच्या पाश्चातीकरणाचे एक प्रमुख उदाहरण आहे. इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा करण्यासाठी Intermittent fasting एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे दोन जेवणामधील अंतर. दोन जेवणातील अंतर केवळ काही तासांनी वाढवले असता इन्सुलिनच्या संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते व शरीरातील अतिरिक्त इन्सुलिनच्या प्रमाणात लक्षणीय घट होते. याला insulin lowering method असेही म्हणतात.

समजा तुम्ही एखाद्या पार्टीत गेल्यावर तिथं चमचमीत चविष्ट खाद्यपदार्थ, गोड मिठाई असेल तर अगदी पोट भरून काहीही खायचं पण त्यानंतर किमान 36 तासांचा उपवास करायचा, त्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलतेवर कुठलाही वाईट परिणाम होत नाही व आधुनिक जीवनशैलीचे आजार जडण्याच्या प्रक्रियेस मोठा ब्रेक लागतो. पूर्वतयारी म्हणून पार्टीआधी 24 तासांचा उपवास करायला काही हरकत नाही. अशाप्रकारे पोट भरून काहीही खायचं परंतु दोन घनपदार्थ सेवनात (solid food intake) म्हणजेच दोन जेवणात योग्य व जास्त अंतर ठेवले तर इन्सुलिन संवेदनशीलतेवर कुठलाही वाईट परिणाम न होता प्रौढ व्यक्तीस जवळजवळ निरोगी जीवन जगता येते. मोठी जखम झाली असेल आणि जखमेत पू भरण्याची शक्यता असेल तर किमान 36 तासांचा उपवास करावा, जखम बरी होईतोपर्यंत दोन जेवणात मोठे अंतर ठेवावे, त्यामुळे जखम वेगाने भरून येते व जखमेत पू भरत नाही. 

सुरुवातीला दोन जेवणातील अंतर 24 तास ठेवावे. या दोन जीवनातील 24 तासांच्या अंतरादरम्यान दिवसातून दोन वेळा कपभर अत्यंत कमी साखर असलेला काळा चहा किंवा हर्बल टी, ग्रीन टी, कमी गोड असलेल्या फळांचा रस घेण्यास हरकत नाही. आठवड्याच्या शेवटी 36 तासांचा उपवास करण्यास हरकत नाही.

नुकतेच मी रुडॉल्फ ब्रेऊस (Rudolf Breuss) या जर्मन-ऑस्ट्रियन संशोधकाच्या ज्यूस थेरपीस पाठिंबा दिला आहे. 42 दिवस केवळ फळांचा व फळभाज्यांचा ज्यूस प्यायचा.... घनपदार्थ म्हणजेच solid food याचे अजिबात सेवन करायचे नाही, असं केलं तर कॅन्सर पळून जातो, आणि नुसताच कॅन्सर पळून जात नाही तर इतर महत्त्वाचे आजार जसे डायबिटीस, उच्चरक्तदाब, हृदयविकार यांना मोठा ब्रेक लागतो. हो.... मित्रांनो हे खरंच आहे. नुसतं दोन जेवणातील अंतर जर 24 ते 36 तास ठेवलं तर महत्त्वाचे आजार जसे डायबिटीस, उच्चरक्तदाब, हृदयविकार यांना मोठा ब्रेक लागतो. 24 ते 36 तासांच्या दरम्यान भूक सहन होत नसेल तर दोन-तीन वेळा कमी साखर असलेला चहा घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणूनच, रक्तदाब व मधुमेहाच्या गोळ्या, औषधे कचऱ्याच्या डब्यात टाका व आहार शैलीत छोटासा बदल करा.

वयाची 48 वर्षे झाली तरी माझा चष्म्याचा नंबर वाढतच होता हा नंबर वाढून "मायनस नऊ" झाला होता पण गेल्या दीड वर्षांपासून मी दोन जेवणात 24 तासांचे अंतर ठेवण्यास सुरुवात केली व दर आठवड्याच्या शेवटी 36 तासांचा उपवास करण्यास ज्यावेळेस सुरुवात केलीमी पंधरा वर्षाचा असताना दहावीत शिकत असताना मला मायनस 1.5 (दीड) इतक्या नंबरचा चष्मा लागला होता. वयाची 48 वर्षे झाली तरी माझा चष्म्याचा नंबर वाढतच होता. हा नंबर वाढून "मायनस नऊ" झाला होता पण गेल्या वर्षभरापासून मी दोन जेवणात कमीत कमी 24 तासांचे अंतर ठेवण्यास सुरुवात केली व दर आठवड्याच्या शेवटी 36 तासांचा उपवास करण्यास ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस माझ्या चष्म्याचा नंबर न वाढता पूर्णपणे थांबला. यापुढे हा नंबर आता कधीच वाढणार नाही. यावरून "Intermittent fasting prevents progressive myopia in adults" - ही बातमी जगातील प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापून येण्याच्या लायकीची आहे. हा शोध मी लावला आहे. 2010 साली अनेक रशियन वेबसाईटवर मी "ख्लेब विझीवाएत ब्लिझोरूकोस्त" म्हणजेच "ब्रेड खाल्ल्याने मायोपिया होतो" अशा प्रकारच्या न्यूज हेडलाईन्स वाचल्या होत्या. खरंतर 2002 सालीच अमेरिकन शास्त्रज्ञ लॉरेन कॉरडेन याने हा शोध लावला होता म्हणजेच स्टार्चयुक्त अति-कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनचे सरासरी प्रमाण वाढून मायनस नंबरचा चष्मा लागतो. परंतु हा अर्धवट शोध आहे. दोन जेवणात योग्य अंतर ठेवल्याने सुद्धा शरीरातील इन्सुलिनच्या प्रमाणावर योग्य नियंत्रण राहते, या महत्त्वाच्या मुद्याकडे अमेरिकन शास्त्रज्ञ लॉरेन कॉरडेन याने दुर्लक्ष केले होते. 

जपान, कोरिया, चीनचा शहरी भाग, सिंगापूर इ. देशामध्ये जवळजवळ 90 ते 95 टक्के युवकांना लांबचे स्पष्ट दिसण्यासाठी मायनस नंबरचा चष्मा घालावा लागतो. विकसित देशातील युवकांमध्ये हे प्रमाण 30 ते 50 टक्के इतके आहे. या देशांमधील शास्त्रज्ञांना हा शोध लावता आलेला नाही किंवा आत्तापर्यंतच्या कुठल्याही वैज्ञानिक साहित्यात याचा उल्लेख नाही. हाच शोध मी लावला आहे. 

दोन जेवणातील अंतर केवळ काही तासांनी वाढवले असता इन्सुलिनच्या संवेदनशीलतेमध्ये सुधारणा होते व शरीरातील अतिरिक्त इन्सुलिनच्या प्रमाणात लक्षणीय घट होते. यावरून दोन आहार उपचार पद्धती गेल्या काही दशकांत निर्माण झाल्या आहेत. यातील पहिली म्हणजे intermittent fasting आणि दुसरी therapeutic fasting. Intermittent fasting मध्ये 16 ते 72 तासापर्यंत घनपदार्थ (solid food) सेवन करणे टाळले जाते (सरासरी कालावधी 24 ते 36 तास) तर therapeutic fasting मध्ये 10 ते 25 दिवसांपर्यंत घनपदार्थ (solid food) सेवन करणे टाळले जाते. Intermittent fasting व therapeutic fasting या दोन्हीमध्ये फक्त दिवसातून दोन-तीन वेळा कपभर अत्यंत कमी साखर असलेला काळा चहा किंवा हर्बल टी, कमी गोड असलेल्या फळांचा रस घेतला जातो. Therapeutic fasting या उपचार पद्धतीद्वारे रुग्णांवर अधिकृतपणे उपचार करण्यासाठी तत्कालीन सोव्हिएट रशियन आरोग्य मंत्रालयाने 1980 साली परवानगी दिली आहे. इतर कोणत्याही उपचार पद्धतीने बरे न होणारे रोग केवळ Therapeutic fasting ही उपचार पद्धती वापरून बरे होतात असं खात्रीलायक वैज्ञानिक साहित्य सांगते.

दुसरं म्हणजे, दात का किडतात? भारतातील मेट्रो शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलांचे दात किडलेले असतात. दात किडण्यापासून रोखण्याचा दावा करणाऱ्या फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि विक्री जोरदार होत असते. परंतु गेल्या शतकातील अमेरिकन शास्त्रज्ञांनी दात किडण्याची कारणे शोधण्यासाठी केलेले संशोधन आधुनिक वैद्यकशास्त्राने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे असं दिसतंय.... प्रत्येकाच्या आहारात चपाती आणि भाकरी असतेच. परंतु चपातीत असलेला गव्हाचा कोंडा व ज्वारीत असलेला ज्वारीचा कोंडा - या कोंड्यामध्ये फायटिक ॲसिड (phytic acid) असते. ह्या फायटिक ॲसिड-मुळे आतड्यांमधील खनिज पदार्थ शोषून घेतले जाऊन शौचाद्वारे बाहेर टाकले जातात. त्यामुळे शरीरात कॅल्शियम, फॉस्फरस इ. अशा अतिमहत्त्वाच्या खनिजांची कमतरता भासते. यामुळे मोठ्या प्रमाणात दात किडले जातात असं महत्त्वाचं संशोधन सांगतंय... यामुळेच मी एका नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात उल्लेख केला आहे की, "धान्याचा कोंडा" ही दुधारी तलवार आहे, कारण धान्याचा कोंडा पूर्णपणे काढून टाकला तर... उदाहरणार्थ, पॉलीश केलेल्या तांदळाचा पांढरा भात, मैद्यापासून बनवलेले पदार्थ (ब्रेड, बेकरी पदार्थ इ.), मैद्याच्या चपात्या खाल्ल्या तर रक्तातील शुगरचे प्रमाण काही मिनिटातच प्रचंड वाढते (huge spike in the blood sugar). आणि दिवसातून वारंवार असं झालं तर इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते व यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. जर धान्याचा कोंडा पिठात तसाच ठेवला तर त्यापासून केलेल्या पदार्थांमुळे रक्तातील शुगरचे प्रमाण वेगाने वाढत नाही, परंतु कोंड्यातील फायटिक ॲसिड-मुळे शरीरासाठी अत्यावश्यक खनिजांची कमतरता भासून दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणजेच "इकडे आड, तिकडे विहीर".... दात किडण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आहारात असलेले मेदांचे प्रमाण.... आहारात मेद कमी असले की फॅट सोल्युबल विटामिन्स म्हणजेच जीवनसत्व अ व ड यांची कमतरता भासते. यामुळेसुद्धा दात मोठ्या प्रमाणात किडतात. दात किडण्याचे तिसरे कारण म्हणजे आहारात ताजी फळे व भाजीपाला यांची कमतरता.... त्यामुळे विटामिन सी ची कमतरता भासते. आहारात विटामिन सी कमी प्रमाणात असले की दात किडण्याची प्रक्रिया वेगाने होते, असं खात्रीलायक वैज्ञानिक साहित्य सांगतं. महाराष्ट्रातील शहरी भागातील लहान मुलांसाठी वरील तिन्ही कारणांपैकी नेमके कुठले कारण दात जास्त किडण्यास कारणीभूत आहे - यावर संशोधन करता येऊ शकते.

यावरून सगळ्यात मोठा गैरसमज दूर होतो तो म्हणजे दात व्यवस्थित घासले नाही तर दात किडतात... प्रत्यक्षात बघायला गेले तर टूथब्रश आणि टूथपेस्टची आवश्यकताच नसते. जेवल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरली तरी चालते..... दातांची स्वच्छता नव्हे तर आपण रोज जे खातो तो आहार दात किडण्यास कारणीभूत आहे, असं खात्रीलायक विज्ञान साहित्य सांगतं. म्हणूनच गेल्या दोन दशकांत पालेओ डायट-ची संकल्पना अस्तित्वात आली आहे पालेओ डायट (Paleo Diet) म्हणजे पालेओलिथिक कालखंडात माणूस जे खात होता ते अन्न.... पालेओलिथिक कालखंड हा शेतीचा शोध लागण्यापूर्वीचा कालखंड म्हणजेच दहा हजार वर्षांपूर्वीचा कालखंड.... शेतीच्या शोधामुळे धान्य वापरात आले आणि धान्याचा वापर अन्नात केल्यामुळे अक्षरशः बहुसंख्य रोगांना निमंत्रण मिळते. म्हणूनच शेतीच्या शोधापूर्वी माणूस जे अन्न खात होता ते अन्न जर आपण खाल्ले तर असंख्य रोगांना टाळता येते. पाळीव पशूंचे दूध वापरण्यास पाच हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्यामुळे पालेओ डायटमध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ सुद्धा वर्ज्य आहेत. मायोपिया (निकटदृष्टीता) आणि दात किडणे हे सहरोग (concomitant diseases) मानले जातात. जगात सगळीकडे 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना या दोन रोगांनी पछाडलेले असते. बालपणी मायोपिया (निकटदृष्टीता) आणि दात किडणे - टाळण्यासाठी पालेओ डायटयुक्त आहार (धान्य-धान्य पदार्थ किंवा दुग्धजन्य पदार्थ सोडून उरलेली निरनिराळी फळे, भाज्या (कच्च्या किंवा शिजवलेल्या), बिया व शेंगा, मांसाहारी पदार्थ इ.) घ्यावा, असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. एकदा शारीरिक वाढ पूर्ण झाली की, तरुण वयात (किंवा त्यापुढील वयात) नुसतं योग्य प्रकारे उपवास करून आधुनिक जीवनशैलीचे रोग (diseases of civilization) सहजपणे टाळता येतात. लहान मुलं ज्यांची शारीरिक वाढ अजून पूर्ण व्हायची आहे, अशांसाठी उपवास करणे सध्यातरी वर्ज्य आहे असं शास्त्रीय साहित्य सांगतं, कारण उपवासामुळे लहान मुलांची शारीरिक वाढ खुंटू शकते. 

टिप्पण्या